शंकर ब्रह्मे ग्रुपवर आलेला हा जुना कृष्णधवल सिनेमा पहायला मन फारसे उत्सुक नव्हते. काळ नको तितक्या प्रचंड वेगाने बदलला असल्यामुळे जुने सिनेमे फार relate करता येत नाहीत.तरी सिनेमाचा,दिग्दर्शकांचा, आणि सामाजिक इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर जुने सिनेमे बघणे क्रमप्राप्त असते.
तर बघायला सुरुवात केली.आणि अर्ध्या तासातच सिनेमाने पकड घेतली.आपण सिनेमा बघत नसून एक करुण भावकविता वाचतो आहोत असा अनुभव येत गेला आणि सलग बघून संपवला.
सिनेमा शक्तिपद राजगुरू यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे .
कलकत्त्याजवळ कुठल्यातरी परिसरात राहणारे एक निम्न मध्यमवर्गीय कुटुंब. आई वडील ,दोन मुली ,दोन मुले.वडील शिकवण्या घेतात.मोठी मुलगी नीता शिकते आहे आणि शिकवण्या घेऊन घराला हातभार लावते आहे.
सगळ्यात मोठा शंकर.त्याला संगीताचे वेड आहे.शास्त्रीय संगीत शिकून त्याला मोठा गायक व्हायचे असते. नीता सोडून घरात कोणालाच त्याचे संगीत शिकण्याचे स्वप्न मान्य नसते.खायला काळ आणि भुईला भार असे टोमणे त्याला घरी दारी ऐकून घ्यावे लागतात.
नीताच्या पाठची गीता..ती वृत्तीने खुशालचेंडू आहे. धाकटा मोंटू तसाच.एकूण घर चालवण्याचे काम सोशिक,कष्टाळू नीताच करत असते.तिचे सनत या हुशार,अभ्यासू तरुणावर प्रेम असते.त्याचेही असते.ती दोघे उद्याची स्वप्ने पाहू लागतात.त्याच काळात चक्कर येऊन पडल्याचे निमित्त होऊन नीताचे वडील जायबंदी होतात. आता घराचा पूर्ण भार नीतावर येऊन पडतो.ती शिक्षण थांबवून कलकत्त्यात नोकरी करू लागते. धाकटा भाऊ एका कारखान्यात नोकरी करू लागतो.पण त्याचा पैसा तो घरी कमी आणि स्वतःवर जास्त खर्च करू लागतो. नीताला भेटण्यासाठी येणारा सनत नकळत गीताच्या शारीर आकर्षणाच्या जाळ्यात ओढला जातो.तोही शिक्षण थांबवून नोकरी धरतो. शहरात फ्लॅट घेतो आणि रितसर गीताशी लग्न करतो.
हा मोठा धक्का नीताच्या जिव्हारी लागतो. संकटांची मालिका पुढे सुरूच राहते. सततच्या
अपमानाला कंटाळून मोठा भाऊ शंकर घर सोडून निघून जातो.पुढे शहरात जाऊन तो नाव कमावतो.यशस्वी होतो.
धाकट्या भावाचा कारखान्यात मोठा अपघात होतो.
त्याला दवाखान्यात दाखल करण्यात येते.उपचारांच्या खर्चासाठी नीता नाईलाजाने सनत आणि गीताच्या दारात जाते. उपकार केल्यासारखे ते मदत करतात.
या सगळ्या व्यापात नीताचे लग्नाचे वय उलटून जाते.ती राबत राहते. अती श्रमाने, ताणामुळे ती क्षयरोगाची शिकार बनते.तरी उपचार न घेता , दुखणे अंगावर काढत ती कष्ट करतच राहते.एव्हाना कमी बुद्धीच्या गीताची निवड करून आपण चूक केल्याची जाणीव सनतला होते. तो पुन्हा नीताकडे प्रेमाची याचना करतो. पण आता खूप उशीर झालेला असतो.ती पाठ फिरवते.
गीताला दिवस गेल्याचे कळताच सनत पुन्हा संसारात रमतो.
शहरात नाव कमावलेला शंकर घरी परत येतो. नीताची अवस्था बघून कळवळतो. तिच्या उपचारांची व्यवस्था करतो. मेघालय मधील थंड हवेच्या ठिकाणी एका मिशनरी हॉस्पिटल मध्ये नीताला ठेवतो.काही दिवसांनी तिला भेटायला जातो.तिची शारिरीक प्रकृती सुधारत असते पण मानसिक प्रकृती खचत चाललेली असते.आयुष्य कधीच भोगू न शकलेली ,फक्त भोगच वाट्याला आलेली , सगळ्यांना मार्गी लावून स्वतःचा मार्ग शोधू न शकलेली नीता,शंकरच्या कुशीत शिरून जगण्याचा विलाप करू लागते...
नीताच्या आयुष्याची शोकांतिका मांडत असताना माणसांचे विविध स्वभाव ,स्वार्थी वर्तन, परिस्थिती शरणता ,मोह , वैफल्य,अशा बऱ्याच गोष्टी सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून दिग्दर्शकाने आपल्याला दाखवल्या आहेत.
गरिबी माणसाला स्वार्थी वर्तन करायला भाग पाडते.गरिबी वंचना,अपमान सहन करायला लावते.चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते.
गरिबी सोशिक,जबाबदार माणसाचे शोषण करते.करू देते.
पण या सगळ्यासाठी फक्त गरिबीला दोष द्यायचा की माणसातील मूलभूत प्रेरणेला,प्रवृत्तीला सुद्धा जबाबदार धरायचे ?
की परिस्थिती आणि प्रवृत्ती मिळून माणसांचे वर्तन व्यवहार ठरतात ?...असे सगळे प्रश्न हा सिनेमा आपल्यासमोर चिंतन करण्यासाठी ठेवतो.
याबरोबरच तत्कालीन सामाजिक प्रश्नही आपल्यासमोर ठेवतो.स्त्रिया शिकू लागल्या,स्वावलंबी बनू लागल्या , अर्थार्जन करू लागल्या तेव्हा या तरुण मुलींच्या जीवावर संसार रेटण्याची नवी अभिलाषा निम्न मध्यमवर्गामध्ये जन्माला आली.तिच्या भवितव्याचा,अपेक्षांचा , सुखाचा विचार न करता तिचा वापर करून घेण्याची विकृती कुटुंबामध्ये निर्माण होणे हाही काळ एके काळी समाजात अस्तित्वात होता.अजूनही काही प्रमाणात असेल.
आई बापाची, भावंडांची जबाबदारी पेलताना स्वसुखाची आहुती देणाऱ्या असंख्य स्त्रियांचे प्रतिनिधित्व नीता करते.
दिग्दर्शक ऋत्विक घटक यांनी हे सगळे बारकावे कोणालाही खलनायक न ठरवता अत्यंत मार्मिकपणे मांडले आहेत.सिनेमा सूचक दृश्यचौकटीतून सुद्धा खूप काही बोलत असतो.तशा अनेक जागा या सिनेमात आहेत. उदा.सनत आणि नीता पहिल्यांदा प्रेमाचे हितगुज करतात आणि दुसऱ्यांदा शेवट करतात त्या दोन्ही वेळा समोरून रेल्वे जाताना दाखवली आहे.आयुष्याचा प्रवास ,काळ याचे सूचन त्यातून होते.
संगीत ही या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू. शंकर हे पात्र शास्त्रीय गायक असल्याचे दाखवले आहे.त्या अनुषंगाने शास्त्रीय संगीतातील चीजा अनेक ठिकाणी वापरल्या आहेत, सतत वाजणारी सतार, रवींद्र संगीताचे काही तुकडे ,काव्य सगळे खिळवून ठेवणारे होते.
मेघे ढका तारा म्हणजे मेघांनी झाकोळून गेलेला तारा... नीता ही असा झाकोळला गेलेला तारा असते.
पण जबाबदारीच्या ओझ्यांनी पिचलेले, झाकोळलेले, त्यामुळे स्वसुखाची आहुती देणारे , नाईलाजाने द्यावी लागणारे असे असंख्य तारे ( स्त्री पुरुष दोघेही)या जगात सदा सर्वकाळ अस्तित्वात असतात हेही एक चिरंतन सत्य आहे.
आमेन...
@ राजश्री बिराजदार