पावसावरील कविता स्पर्धा-2026 📅 2026-09-02 14:20:56 ✍️ सुधाकर भामरे, बडोदा गुजरात | पावसाच्या सरी
पावसाच्या सरी
पावसाच्या सरी
*******

भिजलो होतो चिंब पावसात,

गारवा देत होत्या मनाला,

पावसाच्या सरी !

दुडू दुडू चालत आला नातु,

हातात झेलत होता

पावसाच्या सरी. Il १ ll

क्षणात रमलो भुतकाळी,

नयन पटलावर धावत आल्या,

"त्या" पावसाच्या सरी !

कित्येक श्रावण आले गेले,

स्मृतीत राहिल्या

फक्त पावसाच्या सरी. Il २ ll

डोळ्यात धुंद ओसांडी,

विसितला तरणा

बसला होता बोकांडी;

मनातल्या तरंगांना

देत होत्या सारंग ,

पावसाच्या सरी Il ३ll

ती आणि मी

तिसरा मात्र ना कुणी,

निसर्गाचा आनंद लुटीत

जीवनाचं रहस्य गात होत्या

पावसाच्या सरी. Il ४ ll

गालात हसणे,नजरेत बोलणे.

जिवन होत मंजुळ झरना;

श्रावणाची निखळ ऊब घेत,

झेलत असे आम्ही

पावसाच्या सरी. Il ५ ll

ना रुसवा ना फूगवा

ना थंडी ना गारवा,

चिंब भिजत होतो नदितिरी;

गालावरच्या तीच्या खडीला

स्पर्शित होत्या

पावसाच्या सरी Il ६ ll

श्रावणातले सर सर शिरवे

भिजवुनी जाता भावनांचे रान l

मनातील भावनांना,

संसाराच्या वेदनांना,

गारवा देवूनी जाता

ह्या पावसाच्या सरी ll ७ll

वार्धक्याच्या नाक्यावर

डोळ्यात सलत आहे,

ही गालावरची झुररी l

स्मृतीच्या वसंताला

हलवित होत्या

पावसाच्या सरी !!

पावसाच्या सरी Il ८ll


कवी... सुधाकर भामरे वडोदरा,गुजरात

Mob..9426837924