आली जोरामधे पावसाची सर
त्याला पाहते गवाक्षातून आज
बालपणी हुंदडलो पावसात
चिखलात मिरवत ऐटबाज
येता पहिला पाऊस अंगणात
किती तो आनंद होतसे मनात
सखे सवंगडी धावतच येती
चाललो भिजाया सांगून कानात
आता काठावर वसतसे गाव
कागदी होड्या आणि काट्याची नाव
स्पर्धा सुरू होई मग डबक्यात
शर्यतीत जिंके त्यास येई भाव
येग येग सरी माझा हंडा भरी
गात गाणे, हक्काने काम सांगत
थपथप असा आवाज करत
पाण्यात हळूच रांगत रांगत
अंग कुडकूडे दातही वाजती
आईला वाटतसे सर्दीची भिती
चला घरामधे पुरे पाण्यामधे
येऊन बघ मजा येते ती किती
एक रट्टा मिळे पाठीत जोरात
जावच लागे नाराजीने घरात
आल्याचा चहा आवडत्या कपात
गरम कपडे चढती अंगात
आजी सांगे गोष्टी खूप रंगवून
पावसाचा इंद्रदेव आहे राजा
नियमित दरवर्षी धरेवर
येताना करत येतो गाजावाजा
आकाशात ढग खोड्या करतात
वाऱ्यासवे शिवाशिवी खेळतात
गडगड गडगड आवाजाने
जोरजोरात मोठ्याने भांडतात
चमकते वीज लख्ख उजेडाने
भीती वाटतसे तिच्या आवाजाने
आजीच्या कुशीत डोके खूपसून
अंधार घरात विजेच्या जाण्याने
शिकवतात शाळेतले मास्तर
पाण्याची वाफ, वाफेचे ढग होती
डोंगराला अडता थंड हवेने
पावसाचे रुपाने धावत येती
आनंदले मन पाहून पागोळ्या
पडतात जणू मोतीयाच्या माळा
सुंदर सुंदर मोती दिसे छान
हाती धरण्याचा लागतसे चाळा
एक एक मोती पकडावा वाटे
हातामधे साठे थंडगार पाणी
अवखळ गोडूल्या बालपणच्या
पावसाच्या निरागस आठवणी
नातवंडे खेळतात भिजतात
माझ्यासह पहिल्याच पावसात
अनमोल अनुभव प्रत्येकाने
घेतला पाहिजे नक्की आयुष्यात.
सौ. शोभा देशपांडे
छत्रपती संभाजीनगर
संपर्क - ८१४९०४५७८४
त्याला पाहते गवाक्षातून आज
बालपणी हुंदडलो पावसात
चिखलात मिरवत ऐटबाज
येता पहिला पाऊस अंगणात
किती तो आनंद होतसे मनात
सखे सवंगडी धावतच येती
चाललो भिजाया सांगून कानात
आता काठावर वसतसे गाव
कागदी होड्या आणि काट्याची नाव
स्पर्धा सुरू होई मग डबक्यात
शर्यतीत जिंके त्यास येई भाव
येग येग सरी माझा हंडा भरी
गात गाणे, हक्काने काम सांगत
थपथप असा आवाज करत
पाण्यात हळूच रांगत रांगत
अंग कुडकूडे दातही वाजती
आईला वाटतसे सर्दीची भिती
चला घरामधे पुरे पाण्यामधे
येऊन बघ मजा येते ती किती
एक रट्टा मिळे पाठीत जोरात
जावच लागे नाराजीने घरात
आल्याचा चहा आवडत्या कपात
गरम कपडे चढती अंगात
आजी सांगे गोष्टी खूप रंगवून
पावसाचा इंद्रदेव आहे राजा
नियमित दरवर्षी धरेवर
येताना करत येतो गाजावाजा
आकाशात ढग खोड्या करतात
वाऱ्यासवे शिवाशिवी खेळतात
गडगड गडगड आवाजाने
जोरजोरात मोठ्याने भांडतात
चमकते वीज लख्ख उजेडाने
भीती वाटतसे तिच्या आवाजाने
आजीच्या कुशीत डोके खूपसून
अंधार घरात विजेच्या जाण्याने
शिकवतात शाळेतले मास्तर
पाण्याची वाफ, वाफेचे ढग होती
डोंगराला अडता थंड हवेने
पावसाचे रुपाने धावत येती
आनंदले मन पाहून पागोळ्या
पडतात जणू मोतीयाच्या माळा
सुंदर सुंदर मोती दिसे छान
हाती धरण्याचा लागतसे चाळा
एक एक मोती पकडावा वाटे
हातामधे साठे थंडगार पाणी
अवखळ गोडूल्या बालपणच्या
पावसाच्या निरागस आठवणी
नातवंडे खेळतात भिजतात
माझ्यासह पहिल्याच पावसात
अनमोल अनुभव प्रत्येकाने
घेतला पाहिजे नक्की आयुष्यात.
सौ. शोभा देशपांडे
छत्रपती संभाजीनगर
संपर्क - ८१४९०४५७८४