पावसावरील कविता स्पर्धा-2026 📅 2026-09-02 15:17:38 ✍️ सौ स्मिता शाम तोरसकर | पहिल्या सरींची बरसात
पहिल्या सरींची बरसात
आसमंत ढगांनी भरला
धरतीने काळी शाल पांघरली
अंधाराचे राज्य आले
मोठ्या थेंबांनी धरती भिजली. १

पहिला सरींची बरसात
सुगंध मातीचा आला
चातकाला पाणी मिळाले
मोर आनंदानी नाचला. २

धरती आनंदी झाली
डराव डराव कानी आले
पेरणी करा आता
शब्द आसमंती दुमदुमले. ३

आला सोसाट्याचा वारा
झाड खोड उखडली
धूळ उडवी उंचावर
पालापाचोळ्याने बेगमी केली ४

थेंब पडती जोरात
पळापळ सगळींकडे
हंबरती गुर ढोर
धाव घेती गोठ्याकडे ५

उन्हाची काहीली गेली
डोंगरदऱ्या न्हाऊन निघाल्या.
पक्षी गाणी गाऊ लागले
लहानांनी होड्या सोडल्या ६

सुरुवात झाली पेरणीला
शेतकरी शेतकरीण राबले l
उद्याची आशा बहरली
जीवन पल्लवीत झाले. .७

सौ स्मिता शाम तोरसकर
ठाणे