मृदगंध ओला,आसमंती दरवळला
आला आला,पहिला पाऊस आला ॥धृप॥
निळाईने गडद रंग,नभावर रेखियला
नटखट खट्याळ वारा,वाहू लागला
कसा उतावळा,वसुंधेस भिजवून गेला
आला आला पहिला पाऊस आला ॥१॥
सिंचन होऊन तरूवर,हिरवाई बहरली
धरणीसह खुशीत,वर्षा नाचू लागली
नद्या नाला ओहळ,मुक्त वाहू लागला
आला आला,पहिला पाऊस आला ॥२॥
हंबरती गुरेढोर,सरला वैशाख वणवा
वरूणाचा कृपाप्रसाद,मिळे थंड गारवा
झोंबे पावसाची झड,तडातड अंगाला
आला आला,पहिला पाऊस आला ॥३॥
मृदगंध ओला,आसमंती दरवळला
आला आला,पहिला पाऊस आला ॥
आला आला,पहिला पाऊस आला ॥धृप॥
निळाईने गडद रंग,नभावर रेखियला
नटखट खट्याळ वारा,वाहू लागला
कसा उतावळा,वसुंधेस भिजवून गेला
आला आला पहिला पाऊस आला ॥१॥
सिंचन होऊन तरूवर,हिरवाई बहरली
धरणीसह खुशीत,वर्षा नाचू लागली
नद्या नाला ओहळ,मुक्त वाहू लागला
आला आला,पहिला पाऊस आला ॥२॥
हंबरती गुरेढोर,सरला वैशाख वणवा
वरूणाचा कृपाप्रसाद,मिळे थंड गारवा
झोंबे पावसाची झड,तडातड अंगाला
आला आला,पहिला पाऊस आला ॥३॥
मृदगंध ओला,आसमंती दरवळला
आला आला,पहिला पाऊस आला ॥