वृत्त : कालगंगा / देवविया
पावसाच्या आठवांचे, गीत वाटे चांगले, भारले जे श्वास माझे, आज ते हि रंगले.
सुंदरीचे साज सारे, आठवांनी टांगले,
गूज माझ्या अंतरीचे, ऐकताना दंगले.
विश्व रूपी सागराला, भेटण्याला चालले,
थेंबरूपी आसवांचे, स्वप्न आहे जागले.
मोरणीच्या नाचण्याचे, खेळ आहे भावले, श्रावणीच्या या ऋतूला, रूप आहे लाभले. चातकाला पावसाचे, वेध आहे लागले, सांज वेळी आसमंती, मेघ काळे दाटले. तप्त झाल्या या धरेला, तृप्ततेचे दान हे, भेट झाली पावसाची, काव्य आहे मांडले. बीज आले अंकुराला, मोहरूनी लाजले, पालवीचा स्पर्श होता, रान सारे भाळले. बालकांचे कागदाशी, खेळणे हे चालले, त्या क्षणीच्या आठवांशी , थेट नाते बांधले गर्जना-या निर्झराचे , दृश्य डोळा साठले, हषषलेले रान सारे, डोलताना नाचले. भावरंगी शब्द माझे, आज आहे मांडले, सप्तरंगी इंद्रधनु ने, अंबराला व्यापले. पावसाने पावसाचे, गीत आहे गायले, शब्दरूपी काव्य माझे, मीच आहे वाचले