बालपण (शालेय)
माझी आठवण जुनी चिरकाल
मी होते खूप खूप लहान नी छान
गावी पाऊस बेभान पडायचा
पावसात भिजू नये आईचे ध्यान
येता जाता पावसाची फार घाई
कधी पडे धो धो कधी मुसळधार
नसे छत्री पाटी धरत डोक्यावर
बाबांची गोणपाटाची शाल सुंदर
मित्र मैत्रिणी सोबत पाणी तुडवत
मातीचा सुगंध मन आनंदी होत
कागदी होड्या डबक्यात सोडत
गाडी भुर्रकन चिखल उडवून जात
सांजेला गाय हंबरती गोठयात
दिवे लावणीला आजी वळते वात
नभांचा गडगडाट वीजा चमकत
आजी आजोबां पाढे तोंडपाठ घेत
मोत्या पाण्यात भिजून धावत येत
शेपूट हलवत अंगफटफट झटकत
आरामासाठी बसे ओट्यावर झोपत
शेतकरी कुडकुडत येती घरात थरथरत
लहानपणी मजा असायची पावसात
भिजायची गाणी गात मजा मस्तीत
जेवायला बसायची पंगत घरातली
गुळ पोळीचा लाडू गरम पिठले भात
महाविद्यालयीन आठवणी ,
कॉलेजमधील आठवणींचा पाऊस
मैत्रिणींबरोबर फिरण्याची भारी हौस
पहिल्या दिवशी गप्पा टप्पा जमल्या
सायकली वर चांगला झाला प्रवास
टपरी वरचा गरमा गरम चहा पिताना
कांदा भजी आस्वाद हा चटकदार
मित्र ऊडवती टिंगल टवाळी फार
चेष्टा मस्करी गाणे पावसाचे मजदार
नवनवीन प्रेम युगल दिसायची
हिरवी धरतीने स्वागत करायाचे
आमचे पहिले प्रेम नुकतच झाले
कॉलेज पेक्षा प्रेमच खरे वाटायचे
अशी गेली दहा वर्षे नंतर लग्न
आमचे झाले ते देखील बरसात
होता धो धो पाऊस बाहेर त्यात
मंगलाष्टके अक्षदा गर्दी बहुत
तारुण्यातील आठवणी
पावसातलं प्रेम, लग्न बांधली गाठ
तारुण्यातील हया प्रेमाचा बहार
झुबकेदार वेलीवर फुले दोन सुंदर
सांभाळून घरसंसार कुटुंब भार
मुला मुलींची लग्न झाली
तारुण्य गेले वृद्धपणाची काठी आली
जुन्या आठवणींना देऊनी उजाळा
गळली फुले सुवासिक अन वेली
तारेवरची कसरत केली भरपूर
नोकरी करून केला घर संसार
घरातील जबाबदारी घेऊन अंगावर
किती पावसाळी झेलले थंडगार
बालपणाच्या आठवणी पावसातील
शाळेतील आठवणी पावसातील
प्रेम तारुण्य आठवणी पावसातील
सारया लग्न आठवणी पावसातील
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनझरी
तशीच गोष्ट आमची आहे खरी
पावसातील प्रेम पावसात लग्न
अशा प्रेमाच्या फुलल्या गोष्ट सुंदरी
वृध्दपणा सद्य स्थितीतील आठवणी
वय 75, 70 झाले हातात काठी
पावसात बागेत फिरण्याची मुभा
सायंकाळी आम्ही फिरतो पहा
बागेत जेष्ठ नागरिकांची भरते सभा
आम्ही नात नातवंडांना घेऊन
जातो पावसात छत्री हाती
ते रेनकोट घालतात अंगात
आम्हीच वृद्धपणाचे त्यांचे साथी
पेपर वाचत आरामात गप्पा मारत
बागेत आमच्या खुर्चीत बसून
पावसात इडली चटणी खात
सोबत वडा पाव गरम चहा छान
आठवणी आमच्या पावसाच्या बहू
जणू आयुष्याचे चढ उतार कमान
आठ महिने उन्हाळा हिवाळा ऋतू
चार महिने पावसाळा करी थैमान
हिरवीगार धरत्री झाली आनंदीत
पशुपक्षी बागडती फले फळे बहरती
नदी ,सागर, नाले ,विहिरी, तुडुंब भरती
पावसाची मजा मस्ती सांगावी किती
असा पावसाळा हितकारी भारी
जय जवान जय किसानची महती
भारत कृषीप्रधान देश आहे भूवरी
शेतातुन पिकती माणिक मोती
ज्येष्ठ नागरिक
सौ रोहिणी श्रीकांत कोठावदे
माझी आठवण जुनी चिरकाल
मी होते खूप खूप लहान नी छान
गावी पाऊस बेभान पडायचा
पावसात भिजू नये आईचे ध्यान
येता जाता पावसाची फार घाई
कधी पडे धो धो कधी मुसळधार
नसे छत्री पाटी धरत डोक्यावर
बाबांची गोणपाटाची शाल सुंदर
मित्र मैत्रिणी सोबत पाणी तुडवत
मातीचा सुगंध मन आनंदी होत
कागदी होड्या डबक्यात सोडत
गाडी भुर्रकन चिखल उडवून जात
सांजेला गाय हंबरती गोठयात
दिवे लावणीला आजी वळते वात
नभांचा गडगडाट वीजा चमकत
आजी आजोबां पाढे तोंडपाठ घेत
मोत्या पाण्यात भिजून धावत येत
शेपूट हलवत अंगफटफट झटकत
आरामासाठी बसे ओट्यावर झोपत
शेतकरी कुडकुडत येती घरात थरथरत
लहानपणी मजा असायची पावसात
भिजायची गाणी गात मजा मस्तीत
जेवायला बसायची पंगत घरातली
गुळ पोळीचा लाडू गरम पिठले भात
महाविद्यालयीन आठवणी ,
कॉलेजमधील आठवणींचा पाऊस
मैत्रिणींबरोबर फिरण्याची भारी हौस
पहिल्या दिवशी गप्पा टप्पा जमल्या
सायकली वर चांगला झाला प्रवास
टपरी वरचा गरमा गरम चहा पिताना
कांदा भजी आस्वाद हा चटकदार
मित्र ऊडवती टिंगल टवाळी फार
चेष्टा मस्करी गाणे पावसाचे मजदार
नवनवीन प्रेम युगल दिसायची
हिरवी धरतीने स्वागत करायाचे
आमचे पहिले प्रेम नुकतच झाले
कॉलेज पेक्षा प्रेमच खरे वाटायचे
अशी गेली दहा वर्षे नंतर लग्न
आमचे झाले ते देखील बरसात
होता धो धो पाऊस बाहेर त्यात
मंगलाष्टके अक्षदा गर्दी बहुत
तारुण्यातील आठवणी
पावसातलं प्रेम, लग्न बांधली गाठ
तारुण्यातील हया प्रेमाचा बहार
झुबकेदार वेलीवर फुले दोन सुंदर
सांभाळून घरसंसार कुटुंब भार
मुला मुलींची लग्न झाली
तारुण्य गेले वृद्धपणाची काठी आली
जुन्या आठवणींना देऊनी उजाळा
गळली फुले सुवासिक अन वेली
तारेवरची कसरत केली भरपूर
नोकरी करून केला घर संसार
घरातील जबाबदारी घेऊन अंगावर
किती पावसाळी झेलले थंडगार
बालपणाच्या आठवणी पावसातील
शाळेतील आठवणी पावसातील
प्रेम तारुण्य आठवणी पावसातील
सारया लग्न आठवणी पावसातील
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनझरी
तशीच गोष्ट आमची आहे खरी
पावसातील प्रेम पावसात लग्न
अशा प्रेमाच्या फुलल्या गोष्ट सुंदरी
वृध्दपणा सद्य स्थितीतील आठवणी
वय 75, 70 झाले हातात काठी
पावसात बागेत फिरण्याची मुभा
सायंकाळी आम्ही फिरतो पहा
बागेत जेष्ठ नागरिकांची भरते सभा
आम्ही नात नातवंडांना घेऊन
जातो पावसात छत्री हाती
ते रेनकोट घालतात अंगात
आम्हीच वृद्धपणाचे त्यांचे साथी
पेपर वाचत आरामात गप्पा मारत
बागेत आमच्या खुर्चीत बसून
पावसात इडली चटणी खात
सोबत वडा पाव गरम चहा छान
आठवणी आमच्या पावसाच्या बहू
जणू आयुष्याचे चढ उतार कमान
आठ महिने उन्हाळा हिवाळा ऋतू
चार महिने पावसाळा करी थैमान
हिरवीगार धरत्री झाली आनंदीत
पशुपक्षी बागडती फले फळे बहरती
नदी ,सागर, नाले ,विहिरी, तुडुंब भरती
पावसाची मजा मस्ती सांगावी किती
असा पावसाळा हितकारी भारी
जय जवान जय किसानची महती
भारत कृषीप्रधान देश आहे भूवरी
शेतातुन पिकती माणिक मोती
ज्येष्ठ नागरिक
सौ रोहिणी श्रीकांत कोठावदे